रासा बोर्डा येथील महिलांनी पकडली अवैध दारू

नारीशक्तीचा विजय, अवैध दारू विक्री करणारीही महिलाच

0
वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या रासा व बोर्डा गावातील महिलांनी संघटीत होवून अवेैधरित्या विकली जाणारी देशी दारू पकडली आहे. यावेळी त्यांनी अवैधरित्या दारू विकणा-या महिलांनाही रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. याआधी सुध्दा रासा व बोर्डा येथील महिलांनी अवैध दारू पकडून दिली आहे.
रासा व बोर्डा येथे चाललेल्या अवैधरित्या दारू व्यवसायामुळे कित्येक कुटुंबाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारू प्रश्नाबाबत येथील महिलांनी संबधीत विभागांना माहिती देत निवेदने दिली होती. पण अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणा-यांनी दारूविक्री बंद केली नव्हती. परिणामी महिलांनी संघटीत होत दोनही गावातील दारूविक्रेत्यांची दारू पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि सर्व परिस्थिती पोलीस स्टेशनमध्ये येऊन कथन केली.

 

(वेळाबाई येथे तरुणाची आत्महत्या

या प्रकरणी अवैध दारूविक्री करणा-या माया दुर्गे या महिले विरूध्द व बोर्डा येथे दारूचा पुरवठा करणारा डोल मच्छिंद्रा येथिल सचिन शेनाळे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच वणी पोलिसांनी घोन्सा टी पाईंट जवळ शहरातील रंगनाथ नगर भागातील ईश्वर दशरथ देठे, श्रीनिवास बुचय्या बंडेवार यांना दुचाकीवरून दोनशे 88 दारूच्या 18 हजार रूपये किमतीच्या बाटल्या घेवून जाताना रंगेहात पकडलंय.
Leave A Reply

Your email address will not be published.