Video: मार्डी येथे बंद झालेल्या दारू दुकानातून दारूची सर्रास विक्री
वणी बहुगुणीच्या हाती दारूविक्रीचा एक्सक्लुझिव व्हिडीओ
मार्डी येथे चार बार आणि दोन देशी दारूच्या भट्ट्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार येथील सहाही दारूचे दुकानं बंद झाले. त्यापैकी एका दारूच्या दुकानात राजरोसपणे दारूची अवैध विक्री सुरू आहे. हे सर्व प्रकार राजरोजपणे सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच या अवैध दारू विक्रेत्याला राजकीयय पाठबळ तर मिळत नाही ना अशाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.
(हे पण वाचा: नारीशक्तीचा विजय ! कायर येथील महिलांनी पकडली अवैध दारू)
एकूणच मार्डी येथील परवाना असलेले दारू दुकान बंद झाल्यावरही त्याच जागी अवैध दारूविक्री सुरू करून शासनाची चक्क दिशाभूल केली जात आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.
पाहा वणी बहुगुणीच्या हाती आलेला हा एक्सक्लुझिव व्हिडीओ…