Monthly Archives

August 2024

वणीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार… माधुरी पवारांचे दिलखेचक नृत्य

निकेश जिलठे, वणी: खचाखच भरलेले मैदान... डीजेचे संगीत... अभिनेत्रीच्या दिलखेचक नृत्य... प्रेक्षकांचा एकच जल्लोष... यात रंगला दहीहंडीचा थरार... मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून गोपाळकाल्या निमित्त शुक्रवारी संध्याकाळी वणीतील शासकीय…

वणीत विविध मागणीसाठी भाकपचे धरणे आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वणी एसडीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. वणी विधानसभा मतदारसंघाचे भाकपचे नेते…

चिमुकल्यांसाठी तान्हा पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: तान्हा पोळ्यानिमित्त पोस्ट कॉलोनी हनुमान मंदिर येथे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सं. 4.30 वाजता ही स्पर्धा होणार आहे. या निमित्त चिमुकल्यांसाठी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत…

घरी परतताना वीज कोसळून महिलेचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गोरज येथे वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. निर्मला किसन आत्राम (38) असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना…

‘आझादी की दौड’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय 'आझादी की दौड ' स्पर्धेला विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विदर्भआतील 974 धावपटू…

घोन्सा येथे रविवारी मोफत भव्य नेत्र रोग चिकित्सा शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून रविवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी घोन्सा येथे मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

मोबाईल, कपडे आणि पैसे घेऊन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना संधी साधून एक अल्पवयीन मुलगी घरून निघून गेली. जाताना ती घरून मोबाईल, काही पैसे व कपडे घेऊन गेली. नातीचा आजीने शोध घेतला. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने आजीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.…

शालिनी रासेकर यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: काँग्रेसच्या ज्येष्ट कार्यकर्त्या व माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर यांची राजीव गांधी पंचायतराज संगठणच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्षा मीनाक्षी नटराजन यांनी हीनियुक्ती केली. याबाबत महाराष्ट्र प्रभारी…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्रच नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्रच नाही. त्यामुळे रुग्णांच्या रक्ताचे नमुने पांढरकवडा येथे पाठवावे लागतात. याचा मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वणी येथे रक्त तपासणी केंद्र…

गोविंदा आला रे… ! शुक्रवारी वणीत रंगणार दहिहंडीचा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय मैदानावर शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दु. 4 ते रा. 10 या वेळेत दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी…