बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय मैदानावर शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दु. 4 ते रा. 10 या वेळेत दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही दहिहंडी विदर्भातील सर्वात मोठी दहिहंडी आहे, अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली. हा थरार अनुभवण्यासाठी वणीकरांनी मोठ्या संख्येने यावे ,असे आवाहनही त्यांनी केले.
मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. शासकीय मैदानावर, पाण्याची टाकी येथे ३० ऑगस्ट रोजी दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी असून विविध ठिकाणची गोविंद पथके दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. यावर्षी देखील अनेक गोविंदा पथके सहभागी होणार आहेत.
भव्य दिव्य दहिहंडीचे मनसेतर्फे आयोजन करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी प्राजक्ता माळी यांनी या दहिहंडी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावर्षी विविध मराठी मालिका व सिनेमात अभिनय केलेल्या माधुरी पवार यांची या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. सर्व वणीकर नागरिकांनी दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी येण्याचे आवाहन उंबरकर यांनी केले आहे.
Comments are closed.