सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे अद्याप कळू शकले नाही.
पांढरकवडा परिसरातली कोळसा खडाण सुरू झाल्यापासून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून कोळसा वाहतूक करणारे ट्रक दिवसरात्र सुसाट वेगाने धावतात. ज्यामुळे आज जनावर मेली उद्या माणूस मरेल अशी प्रतिक्रिया जनते कडून ऐकला मिळत आहे. कोळसा वाहतूक करणारे ट्रक ड्रायवर रात्रीला नशा पाणी करून राहत असून ते नशेतच सुसाट वेगाने ट्रक चालवितात.
यापूर्वी रुईकोट व भेंडाला येथील गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन ला केली होती तरीपण आजही ही कोळसा वाहतूक करणारी ट्रक सुसाट वेगानेंच धावताना दिसत आहे. ज्यामुळे माणसाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. ट्रकने धडक देऊन तीन जनावरे मारणाऱ्या ट्रक मालक व चालकांवर कार्यवाही करून सुसाट वेगाने धावणाऱ्या कोळशाच्या ट्रकवर पोलिसांनी अंकुश लावावे अशी मागणी होत आहे. मृत जनावरांचे तपासणी डॉ अवधूत देवकर यांनी केली व एक गाय सहा महिने व दुसरी गाय तीन महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले.