विलास ताजने, वणी : लगतच्या येनाडी ते येनक मार्गावरील रस्ता खचल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्ता एक वर्षांपासून खचलेला आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. मात्र मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
