धनज (बु) येथील महाआरोग्य शिबिरात सुमारे 300 रुग्णांची तपासणी
गरजू रुग्णांना मोफत औषधीचे वितरण
कारंजा: गुरूवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी धनज (बु) प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. संत श्री. डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव (नाईक) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सुमारे 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी या रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली.
या शिबिरात डॉ. सागर मस्के वैद्यकीय अधिकारी, डॉ. सपना जेसवानी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह प्रवीण जिगर मोटवानी सरपंच धनज, प्रवीण ठाकरे उपसरपंच धनज, सुनंदा लोखंडे आशा सेविका, मनोहर शेट्टे पोलीस पाटील, नरहरी कडू पाटील, श्रीकृष्ण ठाकरे यांनी सहकार्य केलं.
महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत झालेल्या या शिबिरात पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाते. तसेच यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाते.