आज 13 पॉजिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 577

ड्रिमलॅन्ड सिटी येथे 3 रुग्ण निष्पन्न

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी तालुक्यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व व्यक्ती या आरटी पीसीआर टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आल्या आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 577 झाली आहे.

आज यवतमाळहून 57 अहवाल प्राप्त झाले. यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 44 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 57 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 577 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 461 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 97 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

ड्रिमलॅन्ड सिटीमध्ये 3 रुग्ण
शहरातील आनंद नगर, सावरकर चौक येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. कर ड्रिमलॅन्ड सिटी येथे 3 रुग्ण आढळले आहे.  ग्रामीण भागात कुंभारखनी येथे 2, भालर येथे 2, ब्राह्मणी. चिखलगाव, राजूर. सोमनाळा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

आज 12 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 12 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 97 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 40 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 57 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 19 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 52 व्यक्ती भरती आहेत.

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल शनिवारपासून सुरू होणार
वणीतील लोढा हॉस्पिटल येथे सुरू होणारे डेडिकेटेड हॉस्पिटल शनिवार पासून सुरू होणार आहे. दरम्यान वस्तीत हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी देऊ नका यासाठी तेली फैल येथील काही नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.