केळापूरच्या जगदंबेचे ‘असे’ करावे दर्शन

यंदा नवरात्रीत राहील हा वेगळा दीपोत्सव

0

अयाज़ शेख, पांढरकवडा: केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा संस्थानात यावर्षी नवरात्री उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनाचा महामारीमुळे शासनाने जी बंधने घातली आहेत त्यांचा अधीन राहून संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हजारोंचा दीपोत्सव ह्याही वर्षीच्या नवरात्र उत्सवाचं आकर्षण राहणार आहे.

विदर्भासह तेलंगाणा परिसरातील भाविकांची येथे अनन्य श्रद्धा आहे. यावर्षी या देवीच्या आराधनेत काही मर्यादा येतील. शासनाने कोरोना संकटामुळे धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी अद्यापही दिली नाही. या मंदिरात दरवर्षी नवरात्रात लाखो भावीकांची मांदियाळी असते. या मंदिरात दरवर्षी मोठी जत्रा पाहावयास मिळते. पण कोरोनामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे दिसत आहे. लोकल न्यूज चॅनलवरून दोन्ही वेळची पूजा दाखविणार आहेत .

भाविकांनी घरूनच दर्शन करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. कोरोनाचे संकट बघता हा महोत्सव अत्यंत साधेपणे केला जाणार आहे. मंदिरात गर्दी टाळण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

अखंड ज्योतीचं आकर्षण

संस्थानाच्या वतीने नवरात्रौत्सव काळात भाविकांसाठी अखंड ज्योत लावण्यात येणार आहे. मागील वर्षी संपूर्ण २ हजार ७०० भाविकांच्या नावावर अखंड ज्योत लावण्यात आली. यंदा ३ हजार ५०० ज्योत लावण्यात येणार आहे. ही ज्योत संस्थांचे कर्मचारी लावतील. भाविकांना ज्योत लावण्याकरिता व तिच्या दर्शनाकरिता उपस्थित राहता येणार नाही. ज्यांना अखंड ज्योत उपक्रमामध्ये सहभाग घ्यावयाचा असेल, त्यांनी संस्थानाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन मंदिर समितीने केले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.