वणी रेल्वे मार्गे धावताहेत आठ सुपरफास्ट गाड्या

वरोरा रोड रेलवे क्रॉसिंगवर दिवसातून 20 वेळा गेट बंद

0

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे वणी रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्यात. मागील आठ दिवसापांसून या रेल्वे मार्गावर तब्बल 8 एक्सप्रेस प्रवासी ट्रेन व मालगाड्या धावत आहेत. रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वणी-वरोरा रोड नांदेपेरा रोड व वणी-यवतमाळ रोडवरील रेल्वे क्रॉसिंग गेट दिवसातून तब्बल 20 वेळा बंद राहतात. वारंवार गेट बंद असल्यामुळे या मार्गावर वाहतूक खोळंबते.

वणी रेलवे स्टेशन प्रबंधक यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम- कोलनूर डिव्हिजनमध्ये नॉन इंटरलॉक वर्क सुरू असल्यामुळे अनेक गाड्यांच्या रूटमध्ये बदल करण्यात आलेत. नागपूर ते चंद्रपूर मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या डाऊन लाईनच्या रेल्वे गाड्यांना माजरी जंक्शन येथून डायव्हर्ट करून वणी, आदीलाबाद, मुतखेड ते निझामाबाद मार्गे पाठविण्यात येत आहे. तर अप लाईनच्या गाड्यांना निझामाबाद येथून डायव्हर्ट करून मुतखेड, आदीलाबाद, वणी, माजरी ते वर्धा नागपूर मार्गे पाठविण्यात येत आहेत.

दिनांक 8 ऑक्टोबरपासून अप लाईनची (02791) सिकंदराबाद- दानापूर एक्सप्रेस (डेली), (02592) यशवंतपुर- गोरखपूर सुपरफास्ट (बुधवार, शुक्रवार), (02975) मैसूर-जयपूर एक्सप्रेस (शुक्रवार, रविवार), (00761) राघवपुराम, निजामुद्दीन दुरंतो (डेली) वणी मार्गे पाठविण्यात येत आहे. तर (02792) डाउन लाईनची दानापूर – सिकंदराबाद एक्सप्रेस (डेली), (02591) गोरखपूर – यशवंतपुर सुपरफास्ट (गुरूवार, शनीवार), (02976) जयपूर – मैसूर एक्सप्रेस (मंगळवार, गुरूवार), व (00762) निजामुद्दीन – राघवपुराम दुरंतो (डेली) याच मार्गाने धावत आहेत.

वरील सर्व गाड्यांचे वणी येथे स्टॉपेज नाही. लॉकडाउनपूर्वी वणी रेलवे स्टेशन येथे स्टॉप असणाऱ्या नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस (डेली) , धनबाद – कोल्हापूर सुपरफास्ट (विकली), संत्रागाछी- नांदेड एक्सप्रेस (विकली) आणि पूर्णा-पाटणा एक्सप्रेस (विकली) ही रेलवे गाड्या अजूनही सुरू करण्यात आलेली नाही.

डायव्हर्ट करण्यात आलेल्या प्रवासी गाड्याशिवाय अनेक मालगाड्या आणि इंजिन शंटिंगमुळे दिवसभरात अनेक वेळा रेलवे गेट बंद असल्यामुळे गेटच्या दोन्ही साईड वाहनांच्या रांगा लागत आहेत. येत्या एक दोन दिवसांत डायव्हर्ट करण्यात आलेल्या गाड्या पूर्ववत केल्या जातील. अशी माहिती वणी रेल्वे स्टेशन प्रबंधक पंकज देवांगण यांनी दिली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.