थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्यामुळे कारवाई

3 ग्राहकांवर गुन्हा दाखल, परस्पर वीज जोडणी न करण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: वीजबिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र थकबाकी न भरता परस्पर वीज पुरवठा जोडून घेणा-या तीन ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. झरी जामणी उपविभागा अंतर्गत मुकुटबन वितरण केँद्रातील हे तीन ग्राहक आहेत.

सदर कारवाईत हेमंत लटारे सहाय्यक अभियंता, मुकुटबन यांनी वीज कायदा 2003 मधील कलम 138 नुसार तक्रार दिली. त्यावरून मुकुटबन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांनी नियमानुसार पूर्ण थकबाकीची रक्कम व पुनर्जोडणी शुल्क भरुन आपला वीज पुरवठा सुरळीत करुन घ्यावा व कटू कारवाई टाळावी असे महावितरण तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

सदर कारवाईत मंगेश वैद्य, मांगीलाल राठोड, हेमंत लटारे, भास्कर देवगडे, अलोणे, आकाश कडु, राहुल ब्राम्हणे, परमेश्वर लाकडे इत्यादींनी भाग घेतला. कोरोना काळात ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरण ही शासकीय कंपनी आर्थिक अडचणीत सापडलेली आहे. अशावेळी कंपनीचे अस्तित्व टिकविण्यासाठी थकीत बील वसुलीचे काम सध्या सुरू आहे.

हे देखील वाचा:

अबब… तब्बल 2 लाखांची दारू केली नष्ट…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.