भावासोबत राहण्याच्या रागातून विटेने मारहाण

गोरज येथील घटना, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: माझ्या भावासोबत राहून माझ्याविरुद्ध भडकवतोस असा आरोप करत एकाने दुस-याला बांधकाम साईटवरील विटेने मारून जखमी केले. सदर घटना तालुक्यातील गोरज येथे घडली. आरोपीचे नाव नंदू शंकर झाडे (36) तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील मधुकर ताजने (45) असे आहे. ही घटना गुरवारी दि. 25 ऑगस्टच्या रात्री 9.30 ला घडली.

Podar School 2025

आरोपी नंदू झाडे व जखमी सुनील ताजने हे तालु्क्यातील गोरज या गावचे राहिवासी आहेत. सुनील ताजने हे नेहमीप्रमाणे जेवण आटोपून घराजवळील चैकामध्ये मित्रांसोबत गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आरोपी नंदू झाडे याचा भाऊसुद्धा होता. हे सर्वजण गप्पा करीत असताना त्यावेळी नंदू झाडे हा तेथे आला. त्याने सुनीलला तू माझ्या विरोधात माझ्या भावाला भडकवतोय. तू माझ्या भावासोबत का राहतोस? असा जाब विचारत वाद घालू लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाब्दिक भांडण सुरु असतानाच नंदुने रागाच्या भरात जवळच सुरू असलेल्या ग्रामपंचायतच्या कामावरील वीट उचलून ताजने यांच्या कपाळावर मारली व जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. एकाएकी झालेल्या हल्याने आणि विटेच्या माराने ताजने बेशुद्ध झाले.

ताजने यांना तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताजने यांनी याविरोधात मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 324, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.