विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर (पिंपरी) येथील जंगलात बकऱ्या चारत असताना एका शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात नामदेव सोयाम (65) नामक शेतमजूर जागीच ठार झाला आहे. आज मंगळवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नामदेव हा स्वतःच्या व इतरांच्या बकऱ्या चरायचे व शेतमजुरीचे काम करायचा. आज तो नेहमी प्रमाणे कायर नजिक असलेल्या जंगलात बक-या चारायला घेऊन गेला होता. दरम्यान दुपारी 2 वाजताच्या सुमारास झुडपात असलेल्या रानडुकराने अचानक नामदेव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नामदेव याला पळून जाण्याचीही संधी मिळाली नाही. या हल्ल्यात नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची महिती वनविभाग व मुकुडबन पोलिसांना देण्यात आली आहे. नामदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.