SPM चे माजी मुख्याध्यापक रावसाहेब देशपांडे यांचे निधन

वणी बहुगुणी डेस्क : वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. र.‌वा. उपाख्य रावसाहेब देशपांडे यांचे सोमवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वा.च्या सुमारास वृद्धापकाळाने नागपूर येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. उत्तम व शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या पश्चात पुत्र अनिल व मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नागपूर येथील शंकर नगर, पोस्ट ऑफीस जवळील त्यांचे निवास स्थान येथून निघणार आहे.

Comments are closed.