लायन्स क्लब वणीचा पदग्रहण सोहळा संपन्न
जितेंद्र कोठारी, वणी: लायन्स क्लब वणी सिटीचा वर्ष 2023- 24 पदग्रहण समारंभ लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा सभागृहात थाटात पार पडला. लायन्स क्लब उप जिल्हा प्रांतपाल लॉयन भरत भलगट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात लायन्स क्लब वणीचे नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व केबिनेटसह नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. लायन्स क्लब वणीची निवडणूक नुकतीच पार पडली असून लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांची अध्यक्ष म्हणून अविरोध निवड करण्यात आली होती. तसेच क्लबच्या सचिव पदावर लायन किशन चौधरी यांची निवड झाली.
लायन्स क्लब पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच विभागीय अध्यक्ष लायन राजकुमार झाडे, झोन-1 अध्यक्ष लायन विकास घाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह लायन्स क्लबच्या मावळत्या अध्यक्षा लायन मंजीरी दामले, सचिव लायन सुनिता खुंगर तसेच नवनियुक्त अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर व सचिव लायन किशन चौधरी मंचावर उपस्थित होते.
लायन भरत भलगट यांनी नवनियुक्त अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी व त्यांचे नवनियुक्त सहकारी लायन शांतीलील पांडे (उपाध्यक्ष), लायन दुरदाना अहेमद ( उपाध्यक्ष), लायन चंद्रकांत जोबनपुत्रा (कोषाध्यक्ष), लायन नरेंद्र बरडीया, लायन प्रमोद देशमुख, लायन पुरूषोत्तम खोब्रागडे, लायन सुधीर दामले, लायन बलदेव खुंगर यांना लायन्स क्लब वणीचे डायरेक्टर म्हणुन त्यांच्या जवाबदान्या संमजावुन सांगितल्या. यावेळी लायन्स क्लबचे नविन सदस्य लायन विणा खोब्रागडे, लायन तुषार नगरवाला, लायन खुशी नगरवाला यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
या वेळी लायन भरत भलगढ़, आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन राजकुमार झाडे, लायन विकास घाटे या मान्यवरानी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले. लायन मंजीरी दामले यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून क्लबच्या मागील कार्याचा लेखाजोखा मांडला. लायन्स क्लब वणीचे नवनियुक्त अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी सर्वाच्या सहकार्याने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीचे अध्यक्ष निकेत गुप्ता, प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार, लायन्स इंग्लिस मिडीयम हायस्कुल, ज्युनियर व सीनीयर कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. चित्रा देशपांडे व सौ सोनाली काळे यानी केले व आभार लायन किशन चौधरी यांनी मानले.
Comments are closed.