बहुगुणी डेस्क, वणी: एका नवविवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. वणीतील सबा कॉलोनी येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवयानी नीरज चट्टे (24) असे मृत महिलेचे नाव आहे. लग्न झाल्याच्या अवघ्या काही दिवसात देवयानीने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
देवयानी ही वणीतील घुग्गुस रोडवर लालगुडा जवळील सबा कॉलोनी येथे आपल्या पतीसह राहत होती. शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी कुणी नसताना तिने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पती घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. देवयानीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे देवयानीच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.