रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची एमआयएमची मागणी
जोरदार घोषणाबाजी करीत वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुस्लिम समाजाबाबत बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमतर्फे करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर ठाणेदार वणी यांना निवेदन देऊन महाराजांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की रामगीरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून रामगिरी महाराजांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देते वेळी आसिम हुसैन (AIMIM वणी शहर अध्यक्ष) साकिब अहमद खान, तौसीफ खान, शहबाज़ अहमद, सय्यद मुफ़ीज़, अज़हर शेख, शाकिर खान, शाहिद शमशेर खान, इमरान शेख, राहत शेख, रेहान शेख, सैयद मुस्तकीम इत्यादींची उपस्थिती होती.
Comments are closed.