आज वणीत संध्या. 7 वा. जय बोला प्रिय पत्नीची नाटक

घरात बायकोचा दरारा आणि तिला भिणारा पती याचा गोंधळ आवर्जून पाहा....

 

वणी बहुगुणी डेस्क: आज दिनांक दिनांक 21 ऑगस्ट पासून जन्मष्टमी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्याचे पहिले पुष्प म्हणजे ‘जय बोला प्रिय पत्नीची’ हे धमाल विनोदी नाटक आहे. श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्या 7 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक राजेश चिटणीस असून यात सीमा गोडबोले, अनिल पाखोडे, श्याम आस्करकरस भावना चौधरी, ऐश्वर्या शिंदे, अविनाश पाटील आणि राजेश चिटणीस हे कलावंत आहेत. नाटकाची निर्माती राजेश्वरी चिटणीस यांची असून संगीत अभिषेक बेल्लारवार, नेपथ्य सतीश काळबांडे तर प्रकाश योजना किशोर बत्तासे यांचे आहे. जय बोला प्रिय पत्नीची हे दोन अंकी विनोदी नाटक आहे. ही कहाणी ढापणे या कुटुंबाची आहे. घरात असलेल्या बायकोचा दरारा आणि तिला भिणारे पती या मुळे जो गोंधळ उडतो, ही या नाटकाची प्रमुख थीम आहे. या आधी व्यावसायिक रंगभूमिवर अनेक दर्जेदार नाटके राजेश चिटणीस यांनी आणले आहेत. या नाटकाचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रयोग झाले आहेत. या नाटकाचा प्रयोग पाहण्यास वणीकरांनी आवर्जून यावे, असे आवाहन ऍड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे.

Comments are closed.