पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या 3 वर्षांपासून शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी नौशाद शहादातुल्ला कुरैशी (34) याच्या शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बुधवारी घुग्गुस येथून अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला केळापूर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली.
आरोपी नौशादवर तीन वर्षांआधी शिरपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 399, 402 व शस्त्र अधिनियमच्या 4/25 नुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. बुधवारी ठाणेदार माधव शिंदे हे पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खबरीकडून नौशाद हा घुग्गुस येथील वार्ड क्र. 2 येथे असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी पो.स्टे.चे पोउपनि रावसाहेब बुधवंत यांना पथकासह घुग्गुस येथे पाठवले. मिळालेल्या पत्यावर नौशाद आढळून येताच पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. अटक झाल्यानंतर त्याला गुरुवारी केळापूर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची यवतमाळ येथील जिल्हा कार्यालयात रवानगी करण्यात आली.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, यवतमाळ, पियूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोवा देवकते सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखात सपोनि/माधव शिंदे ठाणेदार, पोउपनि/रावसाहेब बुधवत, सुनिल दुबे, विनोद काकडे, पंकज कुडमेथे यांनी पार पाडली.
Comments are closed.