आमदार बोदकुरवार यांचा झरी तालुक्यात प्रचाराचा झंझावात

झरीतील मतदार विकासकामांची पावती देणार - आ. बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या झरी तालुक्यात प्रचार दौरा होता. गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडथ, मुकुटबन, पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा, येदलापूर, लिंगटी, धानोरा, रायपूर, दुर्भा, खरबडा, पाटण, दिग्रस, सुर्दापूर, कमळवेल्ली, सतपल्ली, उमरी, अहिरल्ली, दाभा, टाकळी असा प्रवास करीत वठोली येथे प्रचाराची सांगता झाली. गावक-यांनी ठिकठिकाणी त्यांचे हार घालून स्वागत केले. अनेक गावात कॉर्नर सभा व पदयात्रा काढण्यात आली. तर काही ठिकाणी डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. मतदारांनी या निवडणुकीत ते त्यांच्याच पाठिशी राहिल असा आशीर्वाद त्यांना दिला. झरी येथील रॅलीत महिलांनी बोतकुरवार यांचे औक्षण केले. तर प्रचार सभेत मोठ्या प्रमाणात मुस्लीम मतदार देखील सहभागी झाले होते.  

सोमवारी सकाळी गणेशपूर (खडकी) येथे आ. बोदकुरवार यांचा प्रचार ताफा पोहोचला. येथील संत जगन्नाथ महाराज देवस्थानात दर्शन घेऊन आ. बोदकुरवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर वाजत गाजत गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी त्यांना समर्थन देत त्यांचे हार घालून स्वागत केले. त्यानंतर खातेरा वेडद येथे प्रचार ताफा पोहोचला. येथील महिलांनी आमदार बोदकुरवार यांचे औक्षण केले. यावेळी महिलांनी त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पाठिशी राहणार असे वचन दिले. विशेष म्हणजे प्रचार दौ-यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार रॅलीत सहभागी झाले होते. त्यांनी केवळ विकास पाहून मत देणार, असे म्हणत आ. बोदकुरवार यांना पाठिंबा दिला. दौ-यात शिवसेना शिंदे गटाचे नेते विनोद मोहितकर व मोरेश्वर सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह अडेगाव, मुकुटबन, पिंपरड, मांगली, राजूर, पाटण, सुरदारपूर, दिग्रस इत्यादी गावात प्रचार रॅली झाली. काही ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली.

 

झरीतील मतदार विकासकामांची पावती देणार – आ. बोदकुरवार
कॉर्नर सभेत बोलताना आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की 20 वर्ष झरी तालुक्यातील आमदार होते. मात्र त्यांच्या काळात झरी तालुक्याचा कोणताही विकास झाला नाही. मात्र माझ्या अवघ्या 10 वर्षांच्या काळात झरी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात सर्वांगीण विकास होत आहे. रस्ते, पाणी, रोजगार इत्यादी सर्व क्षेत्रात झरीचा विकास सुरु आहे. उर्वरीत कामे या टर्मला पूर्ण करणार. झरी तालुक्यातील मतदारांना माहिती आहे की विकास कोण करतो. त्यामुळे झरी तालुक्यातील मतदार माझ्या विकास कामाची पावती मला नक्कीच देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रचार सभेला प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा तालुकाध्यक्ष झरी(जामनी) सतीश नाखले, ख.वि. अध्यक्ष मुन्ना बोलेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आत्राम, माजी सभापती पं.स राजेश्वर गोंड्रावार, भाजपचे जेष्ठ नेते अशोक बोदकुरवार, बंडू वरारकर, माजी तालुकाध्यक्ष संजय दातारकर, शाम बोदकुरवार, माजी पं.स.सभापती लता अत्राम, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांताबाई जीवतोडे, मिना आरमुरवार यांच्यासह भाजपा, शिवसेने, रिपाई व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज होणार मारेगाव तालुक्याचा दौरा
आज मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मांगरु, मारेगाव, कोलगाव, बुरांडा, वेगाव, हटवांजरी, केगाव, भुरकी पोड, गोधणी, खंडणी, हिवरी, मेंढणी, नवरगाव, सराटी, करणवाडी, बोटोणी या गावांचा दौरा आहे. या दौ-यात मोठ्या संख्येने समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.