मनसेच्या हिसक्यानंतर सोयाबीनची खरेदी, नाफेड करीत होते माल परत

शेतक-यांना वेठीस धरू देणार नाही - फाल्गुन गोहोकार

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच शेतमालाला भाव नसल्याने कास्तकार हवालदिल झाला आहे, त्यातच नाफेड शेतमालात त्रुटी दाखवून माल परत करीत होते. त्यामुळे शेतक-यांमध्ये रोश निर्माण झाला होता. ही बाब मनसेचे राजू उंबरकर यांना कळले. त्यांनी तातडीने या ठिकाणी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक पाठवले. मनसेने तिथे अधिका-यांना धारेवर धरले. त्यांनी अधिका-यांना नियमांप्रमाणे सोयाबिनची खरेदी करण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतक-यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोणत्याही शेतक-यांना वेठिस धरू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिली.

नाफेडने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतक-यांचा कल नाफेडच्या खरेदीकडे आहे.  मंगळवारी नाफेडमध्ये सोयाबीनची खरेदी चालू झाली. बाजार समितीत काही शेतकऱ्यांनी वाहनाने सोयाबीन विक्रीला आणले होते. नाफेडचे कर्मचारी शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या सोयाबीन मध्ये जास्त मॉयश्चर असल्याचे सांगून शेतक-याचा माल परत करीत होते. ही बाब राजू उंबरकर यांना कळली. त्यांनी तातडीने मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व महाराष्ट्र सैनिक यांना खरेदी ठिकाणी पाठवले. 

त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत नाफेडच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये अन्यथा गाठ मनसेशी असल्याचे ठणकावले. मनसेच्या आक्रमक पावित्रा नंतर शेतकऱ्यांचा सर्व माल नियमानुसार खरेदी करण्यात येत आहे. मनसेच्या या पावित्र्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली. शेतकऱ्यांना न्याय मिळताच तेथील उपस्थित शेतकऱ्यांनी मनसेचे आभार मानले.

शेतक-यांना वेठीस धरू देणार नाही – फाल्गुन गोहोकार
शेतक-यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत नाही. अनेक वर्षांपासून महागाई, मजुरांचा दर, बि-बियाणे, खतांचा दर वाढला आहे. मात्र सरकार शेतमालाचा भाव काही केल्या वाढवत नाही. त्यातच विविध कारणं सांगून शेतमाल घेण्यास टाळाटाळ करीत आहे. आधीच कमी भावामुळे हवालदिल झालेल्या झालेल्या शेतक-यांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. यापुढे शेतक-यांना वेठीस धरण्याचा प्रकार समोर आल्यास आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागेल.
– फाल्गुन गोहोकार, तालुका अध्यक्ष मनसे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.