चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार आता वणीत
दर रविवारी जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड येथे देणार सेवा
बहुगुणी डेस्क, वणी: चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार (M.S. (Gerneral Surgery) M. Ch (Urology))आता दर रविवारी वणीत आरोग्य सेवा देणार आहेत. वणी व परिसरातील रुग्णांच्या मूत्ररोग विकारावर (मूतखडा, लघवी करताना जळजळ होणे इ.) दुर्बिण व अत्याधुनिक पद्धतीने डॉ. चिद्दरवार उपचार करणार आहेत. नांदेपेरा रोडवरील समर्थ मेडिकल येथील जाधव सर्जिकल क्लिनिकमध्ये रविवारी दु. १:०० ते संध्याकाळी ४:०० या वेळेत रुग्णांवर उपचार होणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांना 95456 93417 या क्रमांकावर पूर्व नोंदणी देखील करता येणार आहे.
उपलब्ध उपचार –
• दुर्बिणी द्वारे मूत्रमार्गाची तपासणी
• दुर्बिणी द्वारे मूतखडयांचे ऑपरेशन
• दर्बिणी द्वारे प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन
• मूत्रमार्गातील (किडनी, प्रोस्टेट, ब्ल्याडर मूत्राशय, लिंग व अंडकोष) कॅन्सरचे निदान व उपचार
• पुरुष बंधत्व व नपुंसकता उपचार
• अरुंद मूत्रमार्गाचा उपचार
• लहान मुलं व स्त्रियांमधील मूत्ररोग उपचार
दूर्बिनीद्वारा विना टाक्याची शस्त्रक्रिया आता वणीत
जाधव सर्जिकल क्लिनिक येथे लेझरद्वारा विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. दुर्बिनद्वारा विना टाक्यांची शस्त्रक्रिया, मुतखड्याचे आजार, किडनीचे आजार, मुत्राशय, मुत्रनलिका, प्रोटेस्ट्र ग्रंथी इत्यादी मुत्ररोगाचे आजार यावरील निदान आणि उपचार देखील रुग्णांना करता येणार आहे.
सर्जन डॉ. अमित अतुल चिद्दरवार (M.BBS, M.S. (Gerneral Surgery) M. Ch (Urology)) हे चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुंबई येथील सुप्रसिद्ध KEM येथून त्यांनी M. S. केले आहे. सुप्रसिद्ध सायन हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी M.Ch.(urology) मूत्ररोग याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबई येथे देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात प्रॅक्टिस केली असून सध्या ते चंद्रपूर येथे आरोग्य सेवा देतात. त्यांना देशातील विविध फेलोशिपही मिळाली आहेत.
डॉ. चिद्दरवार यांची या नवीन वर्षापासून (2025) पासून दर रविवारी वणीतील जाधव सर्जिकल क्लिनिक येथे रुग्णसेवा सुरू झाली आहे. परिसरातील रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9545693417
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा.
Comments are closed.