कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर!

उपविभागीय अधिकारी तथा वनविभागाला तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कोलार पिंपरी, गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे व झाडी आहेत. यात जंगली जनावर दडलेली असतात बेसावध असताना ते मनुष्य तथा पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. या परिसरात वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर असल्याचं निवेदन देणाऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीदेखील अशा काही घटना घडल्या आहेत. या वाघांचा बंदोबस्त व्हावा म्हणून वणी तालुका कांग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी तसेच वनविभागाला निवेदन दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आधी एका इसमावर वन्यजीवाचा प्राणघातक हल्ला झाला. त्यात तो इसम मरण पावला. गावातील अनेक जनावरांवरसुध्दा हल्ले झालेत. गावात दहशत पसरली आहे. या परीसरातील वाघ, अस्वल, नीलगाय व इतर जनावरांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा या परिसरातील नागरीकांना सोबत घेऊन तालुका कांग्रेस कमेटी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

निवेदन देतेवेळी यवतमाळ मध्यवर्ती बॅकचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रफुल्ल उपरे, दिलीप पिदुरकर, रवींद्र होकम, निवृत्ती ठावरी, मोहन सातपुते, बंडू मालेकर, दिनेश पाऊणकर, धीरज भोयर, प्रेमनाथ मंगाम, सोनू पिदुरकर, गंगाधर परचाके, मधुकर सावे, उमेश चांदेकर, प्रमोद ठाकरे, गोवर्धन पिदुरकर, ज्ञानेश्वर बेलेकर, युवराज ठाकरे, इत्यादि नागरिक उपस्थित होते.

 

Comments are closed.