बहुगुणी डेस्क वणी: फेब्रुवारी महिना लागला की, शिवजयंतीचे वेध लागत लागतात. जगभरात विविध पद्धतींनी शिवजयंती साजरी होते. शहरातही रॉयल फाउंडेशन आणि शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेने यासाठी वेगळा उपक्रम राबवणार आहे. यंदाची शिवजयंती ‘नाचून नाही तर वाचून’ साजरी करण्याचा उद्देश या दोन्ही संस्थांनी डोळ्यांपुढे ठेवला आहे.
त्याचाच भाग म्हणून 9 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 11.30 या वेळेत ‘शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा’ आयोजित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आगळावेगळा मानाचा मुजरा अर्पण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. इयत्ता सातवी ते नववीचे विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. ही परीक्षा वणीतील विठ्ठलवाडी येथील नुरजहा बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालय येथे होणार आहे. विशेष म्हणजे यात रोख रकमांसह पारितोषकांची लयलूट होणार आहे.
प्रथम पारितोषिक 5,000 रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये रोख तर तृतीय पारितोषिक 2,000 रुपये रोख राहील. पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्रासह विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. सोबतच मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र 500 रुपयांची पाच प्रोत्साहनपर बक्षिसे आणि प्रमाणपत्र असतील. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता आदर्श हायस्कूल येथे होईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अथवा नियुक्त शिक्षकांकडे 6 फेब्रुवारीपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 वाजेपर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे. अधिक माहिती करिता तेजस्विनी राजू गव्हाणे 9764253253, विजय गव्हाणे 9822926480, डॉ. रोहित वनकर 9960877996, या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.