विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रूपेश नानाजी अत्राम (22) हा युवक शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मारेगावला निघाला. तो आपल्या आई वडिलांना मामाच्या गावी सोडून परत जात होता. दरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तरुणाच्या पाय गंभीर जखमी झाला आहे.
रूपेश आपल्या बहिणीची प्रकृती बरी नसल्याने वणी येथे रुग्णालयात आपल्या बहिणीला बघण्याकरिता आपल्या आई वडिलांना घेऊन आला होता. नंतर आई व वडिलांना आपल्या मामाच्या गावी सैदाबाद येथे सोडून आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 BR 3618 ने आपल्या गावाला जाण्यास निघाला.
परंतु वाटेतच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रूपेश खाली कोसळला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला सुरवातीला मारेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला वणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Comments are closed.