पुरुषोत्तम नवघरे, वणी: योगासनांचा जगभरात गवगवा आहे. ग्रामीण भागांतही त्याचा आता बोलबाला आहे. नव्या पिढ्यांही त्यात निपूण झाल्या आहेत. याच योगासन स्पर्धेत गोडगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळून ते गोल्डन बॉय ठरलेत. जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे दिग्रस येथे जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धा झाल्यात. या स्पर्धांत 16 पंचायत समितीतील अव्वल ठरलेल्या शाळा सहभागी झाल्यात.
वणी पंचायत समितीतील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा गोडगाव येथील आकाश उत्तम आत्राम यांनी सहा ते अकरा वयोगटात ‘योगासने’ ह्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तो सुवर्णपदकाचा दावेदार झाला. तर विद्यार्थिनी रंजना मंगेश कुमरे ही खो खो खेळात उत्कृष्ट डिफेंडर म्हणून सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
सांघिक खेळात मुलींचा खो खो या प्रकारात यवतमाळ जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावीत रोप्य पदक व चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या शाळेत वर्ग तीन ते पाचमध्ये केवळ दहा मुली असताना त्यांनी हे देदीप्यमान यश संपादन केले. ही शाळा मागील दोन वर्षांपासून सलग केंद्रात चॅम्पियन तर तालुक्यावर उपचॅम्पियन राहिली. मागील तीन वर्षांपासून सतत जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहे.
मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी खेळाडू यांना मेडल, चषक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. विजयी चमू गावात पोहोचताच सर्व गावकऱ्यांनी डीजे लावून मुलांचे दमदार स्वागत केले. मुख्याध्यापक संतोष आसुटकर व सहाय्यक शिक्षक ईश्वर राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. गावातील प्रतिष्ठित नागरिक लीलाधर ठावरी यांनी सुवर्णपदक विजेत्यांना (500₹) पाचशे रुपयाचे बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला. मुलांना बिस्किटे व खाऊ देऊन त्यांचे गोड तोंड केले.
सर्व विजयी चमूंचे स्त्रियांच्या हस्ते एक स्त्रीशक्ती म्हणून त्या मुलींच्या गळ्यात मेडल घालून त्यांचा सत्कार केला. एकेकाळी पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या शाळेचा कायापालट करीत दोन्ही शिक्षकांनी अथक प्रयत्नाने जिल्ह्याच्या शिरपेचात गोडगावचा नावलौकिक वाढविला. गावकऱ्यांनी तेवढ्याच हिमतीने शिक्षकांना तन-मन-धनाने सहकार्य केले. त्यांना प्रोत्साहन दिले.
शिक्षक कर्तुत्त्ववान असतील तर गावाचा मान उंचावतो, असे उद्गार याप्रसंगी लोकांनी काढले. प्रवीण शेळकी यांनी सदर कार्यक्रमाचे उत्तम संचालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले. या यशाचे कौतुक शाळा समितीचे अध्यक्ष अविनाश बोढाले, उपाध्यक्ष सविता चिव्हाने, सदस्य प्रवीण शेळकी, सचिन चंदनकार, सुधाकर बलकी, मंगेश कुंमरे, वैशाली काळे, वैशाली कुमरे, ज्योती गोवारदीपे, सुनीता मते, वंदना मते, सरपंच मंगला आत्राम, रामप्रसाद गिरटकर,
पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित लीलाधर ठावरी, नागोराव कोट्टी, शंकर चामाटे, सचिन काळे, रवी कोट्टी, संजय काळे, सुदाम झाडे, कवडू गावंडे, गणेश दोरखंडे, निकेश दोरखंडे, लाला दोरखंडे, प्रमोद बल्की, विठ्ठल चामाटे, सुरेश चामाटे, गंगाधर मते, भीमराव कुमरे, मंगेश बलकी, संदीप पेदोर, संजय दोरखंडे, संतोष धोटे, सुनील अवगान, अजय धोटे, नीलेश चिव्हाणे तथा समस्त गावकऱ्यांनी मुलांचे कौतुक केले.
Comments are closed.