‘या’ कारणामुळे रागाच्या भरात तोडला शेजाऱ्याचा अंगठा

किरकोळ वाद गेला टोकाला, नवीन लालगुड्यातील घटना

विवेक तोटेवार, वणी: महाभारतात धनुर्धर एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा आहे. यात द्रोणाचार्य गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला अंगठा मागतो. मात्र शेजाऱ्यांच्या भांडणात अंगठा तोडल्याची खळबळजनक घटना नवीन लालगुडा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.

वॉल कंपाउंड पाडल्याच्या कारणावरून दोनशेजाऱ्यांमध्ये वाद झाला. पुढे या शाब्दिक वादाने कळस गाठला. त्यात एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या हाताचा चावा घेत चक्क अंगठा तोडला. घटनेनंतर संतोष राजाराम एनपल्लीवार (44) यांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणात नवीन लालगुडा येथील मोहन चंद्रिका गुप्ता (35) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रत्नपारखी करीत आहेत.

Comments are closed.