अखेर डीबी पथकातील ‘त्या ‘ तीन कर्मचाऱ्यांची बदली

ललित लांजेवार धमकी व रेती तस्करी प्रकरणातून बदलीची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यातील त्या वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली. आता त्यांची वणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर ललित लांजेवार यांना धमकी देणे व रेती तस्करी करण्याचा आरोप होता.

काही दिवसांपूर्वी वणीचे तत्कालीन ठाणेदार अनिल बेहरानी यांना पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले. त्यांना गोहत्या प्रकरणात दोषी असल्याचे बोलले जाते. कारण ते ठाणेदार असताना वणीत शेकडो गाईंचे शिर आढळून आले.
ते गेल्यानंतर वणी ठाण्यातील पोलीस हवालदार विकास धडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम यांच्यावर कारवाई करीत पोलीस अधीक्षक यांनी बदली केल्याचे बोलले जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या तिघांनी रेती तस्करीत हात घालून शासनाला लाखोंचा चुना लावल्याचे व लाखो रुपयांची माया जमवली याबाबत वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. या बातमीनंतर ललित यांनी ही बातमी एका सोशल मीडियाच्या गृपवर शेयर केली. त्यामुळे ललित यांना विकास धडसे यांनी खोट्या गुन्हात फसविण्याची धमकी दिली होती. तशी लेखी तक्रार ललित यांनी खा. संजय राठोड यांना दिली होती.

या धमकीनंतर ललित हे प्रचंड तणावात होते. या तणावात त्यांचा अचानक हृदयिकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे विनोद मोहीतकर यांनी पत्रकार परिषदेत या धमकी देणाऱ्या पोलीस हवालदाराला कायमचे सेवामुक्त करण्याची मागणी केली होती.

शेवटी पोलीस अधीक्षकांनी या तिघांवर कारवाई करीत या तिघांची बदली केल्याचे समजते. या कारवाईनंतर डिबी पथक मोकळा श्वास घेणार का? याकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे

Comments are closed.