रावणाच्या लंकेसह अनेक सृजनांचे ‘हे’ देव आहेत

(झाडे) सुतार समाजाने साजरी केली श्री प्रभू विश्वकर्मा जयंती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रावणाची लंका व तिचे दहन ही रामायणातली कथा सर्वांनाच माहीत आहे. मात्र ही सोन्याची कलात्मक लंका कोणी निर्माण केली हे अनेकांना माहीत नाही. मुळात ही लंका शिल्पकारांचे व सर्वच सृजनांचे दैवत श्री प्रभू विश्वकर्मा यांनी तयार केली असे मानतात. सुतारपुरा येथील महादेव मंदिरात सोमवारी श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी झाली.

मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज संस्था वणी. महिला मंच युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सोहळा साजरा झाला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. समाजातील महिलांनी शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढल्यात. समाजातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चौकाचौकांत चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था सुतार समाज मित्र परिवारातर्फे करण्यात आली. ही शोभायात्रा गांधी चौक, जटाशंकर चौक, डॉ. आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, नटराज चौक या मार्गाने निघाली. सुतारपुरा येथील महादेव मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. यानंतर प्रभू विश्वकर्मा यांचे पूजन व आरती झाली.

प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष शारदा विजय झिलपे होत्या. उद्घाटक देवराव बुरडकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून परिक्षित विनोद पिंपळकर, किसन दुधलकर, महासंघ सदस्य, स्थानिक कार्यकारणीचे अध्यक्ष अमन अशोक बुरडकर, महिलांच्या अध्यक्ष मंगला झिलपे, युवा मंच अध्यक्ष रूपक अंड्रस्कर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

याच सोहळ्यात समाजातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. रांगोळी स्पर्धेतील प्रथम बक्षीस मेघा ओम प्रकाश झिलपे, द्वितीय बक्षीस श्रद्धा अक्षय झिलपे, तृतीय बक्षीस साक्षी राखुंडे यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह स्वरूपात देण्यात आले.

तसेच सुतार समाजाच्या वतीने सुतार समाजरत्न पुरस्कार वितरण करण्यात आले. 2025 या वर्षाचे सुतार समाजरत्न आयुष्याची 38 वर्षे सुतार समाजकार्यात खर्ची घालून समाजाचा प्रचार व प्रसार करून समजाला नवी दिशा दिल्याबद्दल किसनराव दुधलकर यांना देण्यात आला.

मान्यवरांनी प्रभू विश्वकर्मा व सुतार समाजाच्या प्रगती व प्रसाराकरिता विचारमंचावरून आपले विचार मांडलेत. यावेळी नुकतेच एमपीएससी मार्फत पीएसआयपदी नियुक्ती झालेले परिक्षित पिंपळकर यांनी आपल्या यशाच्या प्रवासाबद्दल समाजासोबत हितगुज केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नवघरे व आभार प्रदर्शन रूपक अंड्रस्कर
यांनी केले.

सायंकाळी सहा वाजता समाजातील चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केलो. या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शालिक दूधलकर, प्रशांत झिलपे, गोविंदा निवलकर, विजय जयपूरकर, राजेंद्र पुरस्कार, राहुल वांढरे, महेश राखुंडे, कल्पक अंडरस्कर, शुभम झिलपे, हर्षल घोंगे, दीपक साखरकर, रितिक झिलपे, रितेश साखरकर, किशोर बुरडकर, दिनेश साखरकर, शैलेश झिलपे आदी समाजबांधवांनी सहकार्य केले.

Comments are closed.