अजूनही सेतु सुविधा केंद्राचा पेच सुटला नाही, नागरिकांचे हालच हाल ….

पूर्वीसारखी सेवा मिळण्यासाठी मादगी, मोची, मादरू, मादिगा महासंघाचे निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र बंद आहे. विविध संस्था आणि संघटना ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीचे निवेदन नुकतेच मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाने उपविभागीय अधिकारी यांना दिले.  

अनेक नागरीक या सेतू सुविधा केंद्रातून सेवा घेत होते. सदर सेतूची सेवादेखील चांगली व प्रामाणिक होती. अनेक प्रकारचे कागदपत्रे नागरिकांना तिथून मिळत होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे सेतु सुविधा केंद्र बंद आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यामुळे ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे काढण्याकरीता मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. नागरीकांची समस्या लक्षात घेऊन तहसील कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र तत्काळ सुरू करावे.

नागरिकांना न्याय द्यावा अशा मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले. यावेळी नत्थुजी नगराळे, सूरज चाटे, किशोर मंनथंवार, सदाशिव मंगळपवार, विजय आडराने, रितीक मामिडवार, विशाल मामिडवार, प्रमोद मंथनवार, प्रेम कोमलवार, रवी कोमलवार, सचिन चाटे आदी उपस्थित होते.

Comments are closed.