बहुगुणी डेस्क, वणी: लालगुडा येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. त्यानंतर त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अभय पारखी या सोहळ्याचे अध्यक्ष होते. त्यांच्यासह अनीता टोंगे, प्रतीश लखमापुरे, सुनील गेडाम यांनी महाराजांच्या जिवनावर विचार व्यक्त केलेत.
अध्यक्षीय मार्गदर्शनात पारखी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द उभी केली. नंतर शिवजयंतीनिमीत्त सर्वांना सदिच्छा दिल्यात. संचालन हरीश वासेकर यांनी केले. आभार हरीश बोढाले यांनी मानले. शिवजयंतीच्या यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केलेत.
Comments are closed.