बहुगुणी डेस्क, मारेगाव: वणी-मारेगाव–भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन कॉ. नथ्थू पाटील किन्हेकार सभागृहात झाले. पक्ष कार्यालयावर लाल झेंडा फडकवून कार्यकर्त्यांनी झेंडा गीतासह सलामी दिली. पारपरीक वाजंत्रीच्या गजरात नारेबाजीसह शहरात रॅली काढण्यात आली. वाटेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंग, बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.
रॅलीने संपूर्ण शहराचे व ग्रामीण नागरिकांचे लक्ष वेधले. भगतसिंग चौकात रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सभेपूर्वी महाराष्ट्राचे क्रांतिकारी गायक कॉमरेड धम्मा खडसे व सृष्टी खडसे यांचा क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम झाला. नंतर जाहीर सभेला ए.आय.एस.एफचे राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रसाद गोरे परभणी, भाकपचे जिल्हासचिव कॉम्रेड अनिल घाटे, जिल्हा सहसचिव कॉ. संजय भालेराव, किसान सभेचे राज्य कौन्सिलर कॉ. अनिल हेपट, सुनील गेडाम यांनी मार्गदर्शन केले.
सभा संपल्यावर सभागृहात तालुक्यातील 32 गावांतून आलेल्या 150 प्रतिनिधींच्या अधिवेशन सत्राला सुरूवात झाली. पहिल्या सत्रात अधिवेशनाचे उद्घाटन झाले. तालुका सचिव ढुमणे यांनी मागील तीन वर्षांचा राजकिय व संघटनात्मक अहवाल मांडला. अहवालावर 12 प्रतिनिधींनी आपली मते मांडली. भोजनावकाशानंतर दुसऱ्या सत्रात पुढील तीन वर्षांकरिता 27 सदस्यीय तालुका कौंसिलची व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवीन कौंसिलने पुढील तीन वर्षांचा भविष्यकालीन कृती कार्यक्रम प्रतिनिधींसमोर ठेवला.तो सर्वांनी एकमताने मंजुर केला. निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्ंयामध्ये तालुका सचीव कॉ. बंडू गोलर व सहसचीव कॉ. ईरफान व कॉ. भास्कर सपाट यांची निवड झाली. तसेच विविध जनसंघटनांचे पदाधिकारी म्हणून किसानसभा तालुका अध्यक्ष कॉ. गणेश कळसकर, शेतमजूर युनियन तालुका अध्यक्ष कॉ. लक्ष्मण आत्राम, महिला फेडरेशन तालुका अध्यक्ष कॉ. लता रामटेके,
अॉल इंडिया युथ फेडरेशन अध्यक्ष कॉ. प्रफुल आदे, सचिव अक्षय रामटेके, आॅल इंडिया स्टुडंन्ट फेडरेशन अध्यक्ष कॉ. सुनील जुनगरी, आयटक जनसंटनेच्या प्रेमिला मलकापूरे, आशा खामनकर, नीता सोयाम, सुरेखा मिलांदे, शब्बीर खान पठाण यांचे सर्वांनी पुषपगुच्छ देऊन अभिनंदन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन कॉ. प्रेमीला मलकापुरे यांनी तर आभारप्रदर्शन कॉ. बंडू गोलर यांनी केले.
Comments are closed.