नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या जीवनातील अनेक रहस्य उलगडतील ३ मार्चला
प्राचार्य राम उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष व्याख्यान
बहुगुणी डेस्क, वणी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनचरित्र अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गूढ घटनांची उकल झाली नाही. त्यांच्या आयुष्यातील अनेक कथित-अकथित घटनांचे रहस्योद्घाटन सोमवार दिनांक 3 मार्चला होणार आहे.
वक्तादशसहस्रेषु अशी ख्याती असलेले विश्वविख्यात प्राचार्य राम उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या स्मृत्यर्थ वणीतील शिक्षण प्रसारक मंडळ 16 वे स्मृती व्याख्यान घेत आहे. हे व्याख्यान सोमवार दिनांक 3 मार्चला सायंकाळी ठीक 6.०० वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये होईल.
पारस येथील महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्राचे अभियंता अंबरीश पुंडलिक हे वक्ते मुख्य पुष्प गुंफतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी चरित्रावर, ‘नेताजी एक क्रांतीपर्व’ या विषयावर हे व्याख्यान होणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार हे अध्यक्षतेस्थानी राहतील. या व्याख्यानाचा वणी आणि परिसरातील समस्त सुजाण नागरिकांनी अधिकाधिक संख्येने लाभ घेण्याची विनंती प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केली आहे.
Comments are closed.