पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर दिला आहे. योगायो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आरंभही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 पासून सुरू झाला. शनिवार दिनांक 1 मार्चला वणी तालुक्यातील बालकांची आरोग्य तपासणी मोहिमेचा या शाळेपासून झाला.
वणी तालुक्यातील 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठीची ही मोहिम आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभागांच्या समन्वयाने ही मोहीम राबविली जाणार आहे.
वणी तालुकास्तरीय मोहिमेचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, विस्तार अधिकारी नीलेश हेडाऊ, मुख्याध्यापक गजानन कासावार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक गोफणे, अरुणा गुरनुले उपस्थित होते.
वणी तालुक्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटांतील साधारण एक लाखापेक्षा अधिक मुलांची आरबीएसके कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी होणार आहे. प्रत्येक मुलाची सर्वांगीण तपासणी, सिस्टमॅटिक क्लिनिकल आवश्यकतेनुसार तपासणी, विद्यार्थ्यांचा रक्तदाब व तापमान मोजणी आणि गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहेत.
नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार त्वरित उपचार व शासकीय व आरबीएसके तसेच एमजेपीजेएवाय अंगीकृत रुग्णालयांमध्ये निःशुल्क संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. किशोरवयीन मुला-मुलींमधील रक्तक्षय तपासणी तसेच शारीरिक, मानसिक आजार शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर शाळा क्रमांक 7 च्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विवेक गोफणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैराज भिलावेकर यांनी केले . शाळा क्रमांक 7 चे पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. वैशाली गोफणे, डॉ मंजूषा दुगाने, डॉ किशोर भांडेकर, सुलोचना वऱ्हाटे, सुनीता पथाडे, जया तेलतुमडे, शाळा क्रमांक 7 च्या शुभांगी वैद्य, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे यांनी परिश्रम घेतलेत.
Comments are closed.