गणिताचे जादुगर असलेल्या विद्यार्थ्यांनी केले थक्क 

अबॅकस चॅम्पियनशिपमधील प्रज्ञावंतांवर कौतुकांचा वर्षाव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणित म्हटलं की अनेकांना टेंशन येतं. त्यात मोठमोठाले गुणाकार आणि भागाकार असतील तर विचारण्याची सोयच नाही. मात्र अबॅकस तंत्रानं अवघड अशी गणिते विद्यार्थी हातासरशी मोकळी करतात. ते पाहून सर्वच अचंबित होतात. अशाच गणिताचे जादुगर असलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव महालक्ष्मी सुपर अबॅकस अकॅडमीने केला.

महालक्ष्मी सुपर अबॅकस अकॅडमीने इंटरक्लास चॅम्पियनशिप परीक्षा घेतली. यात एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील विजेत्या गुणवंतांना ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या प्री कॉर्डिनेटर मृणाल दोंतुलवार यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आल्यात.
सुपर अबॅकस 0 लेव्हलमध्ये नकुल राखुंडे, विवान तुगनायत,ओम पोचमपल्लीवार यशस्वी झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पार्ट सिलॅबस- 1मध्ये शरयू घलानी, ली लेव्हल, हितार्थ कटारिया, प्रिनल धाडसे, श्रीयांश कोंडावार यांनी आपले विशेष कौशल्य दाखविले. यात २, ३ आणि ४ लेव्हल झाल्यात. त्यात दुसऱ्या लेव्हलमध्ये युगांश पोपली, उन्नत कटारिया, रिधान गोखरे यांनी बाजी मारली. तिसऱ्या लेव्हलमध्ये जिगीषा कोठारी, जीविका जांभुळकर आणि चौथ्या लेव्हलमध्ये अन्वी गोरंटीवार, आभा कोंडावार, भौमिक बोथरा यांनी आपली चुणूक दाखविली.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले. कार्यक्रमाला सुरेंद्र नालमवार आणि अक्षय गोरंटीवर प्रामुख्याने उपस्थित होते. महालक्ष्मी सुपर अबॅकसच्या संचालिका दिव्या अक्षय गोरंटीवार आणि एकता सुरेंद्र नालमवार यांनी यासाठी विद्यार्थ्यांवरती विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.