मार्चच्या सुरवातीलाच ‘मार्च एंडिंगचं’ वणीकरांना आलं टेंशन

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची करांवरील व्याज व दंड माफ करण्याची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपालिकेने मार्च संपण्यापूर्वी ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी मालमत्ता व पाणीकराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. या करांवर भरमसाठ रक्कम व्याजाच्या स्वरूपात आकारण्यात येत आहे. त्यात बरीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना टेंशन येत आहे.

या व्याजाच्या संदर्भात नगर पालिकेत मानवी हक्क सुरक्षा परिषदेने चौकशी केली. संगणक प्रणालीतील सॉफ्टवेअरमुळे व्याजाची रक्कम माफ अथवा कमी करता येत नाही असे केविलवाणे उत्तर मिळत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नागरिकांवर असलेला हा बोझा कमी व्हावा म्हणून मालमत्ता व पाणीकरावर आकारण्यात येत असलेले व्याज माफ करण्यात यावे. जेणेकरुन नागरीकांना कर भरणे सुलभ होईल. यासासाठी व्याजमाफीचा ठरावसुद्धा करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केले आहे.

यावेळी मानवी हकक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा प्रमुख भाऊसाहेब आसुटकर, वणी शहराध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सुमित्रा गोडे, वणी तालुका महिला अध्यक्ष सुनीता काळे,

वणी शहर महिला अध्यक्षा प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे, प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदीप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, ज्ञानेश्वर बोनगीनवार, अमोल कुमरे, मारेगाव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा मनीषा निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.