बहुगुणी डेस्क, वणी: ती विवाहित तर तो अविवाहित. दोंघांच्या वयात सात वर्षांचा फरक, मात्र दोन जिवांची तार कधी जुळली कळलंच नाही. हळूहळू प्रेम बहरायला लागलं. पाहता पाहता दोन वर्षं निघून गेलीत, मग पुढं ‘त्याचं’ लग्न जुळलं. तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रियकराला हे काही रुचले नाही. ती दिसली की तो तिला शिवीगाळ करायचा. मात्र शुक्रवारी तर त्याने हद्दच केली. भर रस्त्यात महिलेचा हात धरून त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मजनूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता (35) ही वणीतील रहिवासी आहे. ती विवाहित आहे. तिचे एक अविवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध होते.नुकतेच प्रियकराचे लग्न जुळले. त्यामुळे प्रेयसीने त्याच्यासोबत ब्रेकअप केला. त्यामुळे प्रियकर तिला नेहमीच शिविगाळ करायचा. बोलण्यासाठी जिद्द करायचा. शुक्रवारी दिनांक 7 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पीडित महिला ही सर्वोदय चौकातील शर्मा कॅन्टीन जवळ होती. दरम्यान तिथे आरोपी गेला.
त्याने तिचा हात पकडून तिला बाजूला चल अशी जोर जबरदस्ती करू लागला. तिचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न करू लागला. या प्रकाराने पीडिता घाबरली. तिने वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीनुसार रंगनाथ नगर येथील आरोपी नाझीम इकबाल खान पठान (27) विरोधात कलम 74, 352 BNS अन्वये जबानी रिपोर्ट वरून गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास पो.उप.नि धनंजय रत्नपारखी करत आहेत.
Comments are closed.