दुचाकीसमोर आडवे आले जनावर, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

वांजरी येथील तरुणाचा गावी परताना नांदेपेरा रोडवर अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकीने गावी परतताना एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. राहुल सुरेश धांडे (30) असे मृत तरुणाचे नाव असून तो वांजरी ता. वणी येथील रहिवासी होता. राहुल हा रविवारी दिनांक 16 मार्च रोजी कामानिमित्त वांजरीहून त्याच्या दुचाकीने (MH 29 CD 5247) वणी येथे आला होता. काम संपल्यानंतर तो संध्याकाळी गावी परतत होता. दरम्यान रा. 7.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवर ढेंगळे यांच्या घराजवळ राहुलच्या दुचाकीसमोर एक जनावर आले. अचानक जनावर आल्याने राहुलने ब्रेक मारला. दरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीची बाजूला असलेल्या जनावराला धडक बसली. या अपघातात तो खाली कोसळली. दुचाकी भरधाव असल्याने राहुलच्या डोक्याला गंभीर मुका मार लागला. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना याची माहिती देऊन ऍम्बुलन्स बोलावली. राहुलला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.