नांदेपेरा रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

वणी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगर समोर मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी स. 10.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. हा परिसर झाडाझुडपांचा असून या मार्गावर स्वर्णलीला शाळा आहे. मृत इसमाचे वय हे 30 ते 35 वर्षे असावे असा अंदाज बांधला जात आहे. या वर्णनाचे कुणी इसम बेपत्ता असल्यास वणी पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रकरणी कलम 194 बीएनएसएस अन्वये मर्ग वणी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.