शास्त्रीनगर येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

आईने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र....

बहुगुणी डेस्क, वणी: शास्त्री नगर येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौशल्या मनोज साखरकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे. ती काही दिवसांआधी माहेरी वणी येथे आली होती. ती शास्त्रीनगर येथे आपल्या आई वडिलांसह राहत होती. दुपारी 4 वाजताच्या सुमारास कौशल्या व तिची आई घरी होती. दरम्यान तिची आई स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी संधी साधून कौशल्याने खोलीत गळफास घेतला. खोलीत आई आली असता तिला कौशल्याने गळफास घेतलेला आढळला. तिथे मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिला यश आले नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कौशल्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून कौशल्याची मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बोधेनगर चिखलगाव मध्ये ब्लॉकसह घर विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमनाळा, गौराळा फाट्याजवळ एका पाठोपाठ एक अपघात

Comments are closed.