बहगुणी डेस्क, वणी: या आधुनिकीकरणाच्या जमान्यात आजही ग्रामीण भागातील लोक शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. मात्र एखादी अगदी शुल्लक घटना कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि या शेजारधर्मात वितुष्ट येतं. अशीच घटना तालुक्यातील मानकी येथे घडली. बकरीच्या निमित्तावरून झालेली बाचाबाची थेट मारहाणीवर जाऊन पोहचली.
तक्रारीनुसार शेतकरी असलेले भाऊराव नामदेव माहुरे (75) तालुक्यातील मानकी येथे कुटुंबासह राहतात. ते शेतमजुरी करतात. त्यांच्या घरासमोर तुळशिराम निकुरे हे त्यांच्या परीवारासह राहतात. दोघेही शेजारी असून एका छोट्याशा कारणावरूनच मोठे वादळ उठलं. निकुरे हे माहुरे यांच्या घरासमोर रोडवर त्यांच्या बकऱ्या बांधतात. जवळपास 15 दिवसांपूर्वी त्यांचा जगन्नाथ शंकर माहुरे (24) हा त्याचं टाटा अॅपे हे वाहन घेऊन घरी परतत होता.
मात्रा त्या दरम्यान त्याच्या गाडीचा तुळशिराम निकुरे यांच्या बक-या कट लागला. त्यावरून मग वादविवाद झाला. सोमवारी माहुरे यांची सून व नातू जगनाथ घरीच बसलेले होते. गैरअर्जदार नितीन नंदू निकुरे (20), विनायक नंदू निकुरे (23), जीवन लेनगुरे (25), ईश्वर तुळशिराम निकुरे (36) हे माहुरे यांच्या घरासमोर आलेत.
त्यांच्या हातात लाकडी उबारी म्हणजेच बैलगाडीचा एक दांड्यासारखा भाग होता. ते माहुरेंच्या नातवाला शिविगाळ करू लागलेत. त्यांच्या हातातील लाकडी उबारीने त्याला मारहाण करणे सरु केले. हे भांडण सोडवण्यासाठी भाऊराव व त्यांची सून मध्ये पडलेत. तेव्हा त्यांनादेखील शिवीगाळ करुन लाखडी उबारीने मारहाण केली.
या मारहाणीत भाऊराव यांचा नातू जगन्नाथ माहुरे याचे डोके फुटले. त्यातून रक्त निघाले. त्याच्या डाव्या हाताला मार लागला. फिर्यादीच्या पासोडीला व उजव्या टोंगळ्याला मार लागला. त्यांच्या सुनेच्या दोन्ही हातांना, कंबरेला व डोक्याला मारहाण करुन निघून गेलेत. नंतर फिर्यादीने वणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरोधात कलम 352, 3(5), 118(1) अन्वये गुन्हे दाखल झालेत.
Comments are closed.