बहुगुणी डेस्क, वणी: राम नवमी निमित्त वणीतील प्रभू श्रीराम मंदिर जुनी स्टेट बँक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दिनांक 2 एप्रिल ते शनिवारी दिनांक 5 एप्रिल पर्यंत रोज संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी जन्मोत्सव सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष भास्कर गोरे यांनी केले आहे.
बुधवारी दिनांक 2 व 3 एप्रिल रोजी संध्या 7.30 वा. संगीतमय गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदोर येथील अभय मानके व संच गीतरामायण सादर करणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6 वा. स्वरसाज संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील अजीत खंदारे व संच आपली कला सादर करणार आहे. तर शनिवारी सं. 6 वाजता नागपूर येथील नंदू गोहणे व संच ऑर्केस्ट्र सादर करणार आहे.
रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी दु. 12 वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सवाची तयारी राजाभाऊ बिलोरिया, विजय चोरड़िया व अरुण कावडकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समितीचे सदस्य व स्वयंसेवक परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाला वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समिती द्वारा करण्यात आले आहे.
Comments are closed.