राजूर येथील फ्री मेथॉडिस्ट चर्चमध्ये “पाम संडे” साजरा

वाजत गाजत निघालेल्या भव्य रॅलीने वेधले लक्ष

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे ख्रिस्ती समाजातील पाम संडे हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक 13 एप्रिल 2025 ला सकाळी 8 वाजता हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅलीत काढण्यात आली. गेल्या 62 वर्षापासून ही परंपरा कायम आहे.  पाम संडे निमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ख्रिस्ती समाजबांधवांनी हाता खजुराचे पानं घेऊन संपूर्ण गावात मोठी रॅली काढली. खजुरांच्या पानाचा क्रॉस ही बनवण्यात आला. 

यावेळी रॅलीत फ्री मेथॉडिस्ट चर्च कमिटीचे अध्यक्ष पास्टर शालुरकर ,सचिव डेविड पेरकावार ,खजिनदार प्रकाश तालावार ,सरपंच विद्या पेरकावार, बाबू कुक्कलवार, प्रवेश तालावार ,जिजस कोमलवार, थॉमस कोमलवार, मारोती बावणे, आकाश पेरकावार,अब्राहम कलवलवार ,शाम संगमवार, रोहित पारखी,समुवेल येलपुलवार, विनोद तांड्रा, होस्तम कोमलवार, प्रभाकर कोमलवार,अजय कंडेवार, विवेक तालावार समस्त युवकवर्ग, पुरुषवर्ग,महिलावर्ग व समाजबांधव उपस्थित होते.

‘पाम संडे का साजरा केला जातो?
गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले, त्याच्या आदल्या रविवारी प्रभू येशूचे जेरुसलेम नगरीत आगमन झाले होते. त्या दिवशी येशूचा स्थानिक नागरिकांनी खजुराची पाने दाखवून स्वागत केले. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही जगभरातील ख्रिस्ती बांधव ‘पाम संडे’ साजरा करतात. पाम संडेला पवित्र आठवड्याची सुरुवातही मानली, आठवड्याचा शेवट म्हणून इस्टर संडे साजरा केला जातो. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.