भाजपा वणी शहराध्यक्षपदी विधिज्ञ ऍड. नीलेश चौधरी यांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मोर्चेबांधणी सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वत्र तयारी सुरू झाली. त्यासाठी सर्वच पक्षांसह भाजपाही कामाला लागली. भाजपासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने शहरच्या अध्यक्षपदी येथील विधिज्ञ ऍड. नीलेश माया महादेवराव चौधरी यांची नियुक्ती केली आहे. वणी नगर पालिकेच्या निवडणुकीची धुरा आणि पक्ष विस्ताराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा उपयोग पक्षास होईल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहे. त्यांचा समाजातील प्रत्येक घटकासोबतचा संपर्क दांडगा असून सर्व समावेश वृत्तीमुळे ते एक आवडते व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळे पक्ष बांधणी व विस्ताराकरीता पक्षास उपयोग होणार आहे.

रॉयल फाउंडेशन वणीचे संस्थापक, वकिली क्षेत्रातील दांडगा आणि दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सोबतच सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांचं अत्यंत यशस्वी नेतृत्व पाहायला मिळतं. प्रज्ञावंत, प्रतिभावंत अशा युवा नेतृत्त्वाचा पक्षाला मिळाल्याने नगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि तत्सम निवडणुकांत भाजपा अधिक बळकट होईल असा विश्वास दर्शविला जात आहे. पक्षाच्या वणी येथील छोटेखानी कार्यक्रमात पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चौहाण यांनी तसेच भाजपार्टीच्या संपूर्ण पक्षश्रेष्ठीनी शहराध्यक्षाची धुरा ऍड.चौधरी यांच्यावर सोपवली आहे.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, ऍड. नीलेश चौधरी यांचा मित्रपरिवार तथा रॉयल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीसाठी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डें, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर यांनी ऍड. नीलेश चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.