बहुगुणी डेस्क, वणी: महाकवी कालिदास म्हणजे संस्कृत वाङ्मयाला पडलेलं सोनेरी स्वप्न. त्यांचा जन्म मृत्यू किंवा कारकीर्द याबद्दल कोणताच ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यांचं मेघदूतम हे महाकाव्य बरंच गाजलं. त्याची सुरुवातच ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी आहे. म्हणजेच आषाढाच्या पहिल्या दिवशी. म्हणून आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालिदासदिन म्हणून साजरा करतात.
आदर्श प्रशासकीय महाविद्यालय व संस्कृत भारती वणी शाखेने महाविद्यालयात कालिदास दिन साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मेघदूत या खंडकाव्यातील अनेक प्रसंगांचे, व्यक्तिचित्रांचे रसग्रहण केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र गौरकार, उपाध्यक्ष उज्ज्वला गौरकार, सचिव पुरुषोत्तम नवघरे, प्राचार्य निशांत खोब्रागडे, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमात संस्कृत भारतीचे नगरमंत्री प्रा.महेश पुंड, प्रा. प्रिया सावरकर यांनी उपस्थित अंशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता किसन किनाके, शुभम गानफाडे, अमित काळे, प्रा. पाटील, रंजना बल्लावार, रिता काळे, दीपक मोहुर्ले, मीना बावणे यांनी सहकार्य केले.
Comments are closed.