रा. शाहू महाराज हिंदी विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अभियान 

शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारे संचालित राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात शासकीय ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या अभियानात वृक्षारोपणासह पालक सभा, शिक्षक-पालक सभा, हरित सेना, आणि नशामुक्ती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागरूकतेवर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वणी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, विशेष अतिथी म्हणून श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रांत चचडा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अतुल राजगडकर, आणि राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य राकेश देशपांडे होते.

जयंत सोनटक्के यांनी आपल्या भाषणात, “आई आणि वृक्ष दोघेही जीवनाला समृद्ध करतात. आज झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले. राकेश देशपांडे आणि अतुल राजगडकर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. अभय पारखी यांनी शासकीय अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सहशालेय उपक्रमांची माहिती देत ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माता पालक सभेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हरित सेना आणि इतर उपक्रमांसाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभुदास नगराळे यांनी केले, सूत्रसंचालन गंगारेड्डी बोडखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तुषार घाणे यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता शालेय परिसरात वृक्षारोपणाने झाली. या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक अनिता टोंगे, प्रतिष लखमापूरे, भाग्यश्री लांडे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र देवतळे, जितेंद्र डगावकर, हरीष बोढाले, सुनिल गेडाम, हरीष वासेकर आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढवण्यास मदत झाली.

Comments are closed.