वणीतील जैन ले आऊट येथून दुचाकी चोरी

कधी थांबणार दुचाकी चोरीचे सत्र

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैन लेआउट परिसरातील एक दुचाकी चोरीला गेली. 31 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सातत्याने दुचाकी चोरी होत असल्याने वणीकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.  

फिर्यादी सागर सुधाकरराव पाटाळकर (वय 42) हे जैन ले आऊट येथील रहिवासी असून त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांच्याकडे टीव्हीएस स्पोर्ट्स ही मोटरसायकल (क्र. MH 29 BJ 3650, किंमत अंदाजे ₹30,000/-) आहे. ते दैनंदिन वापरासाठी या दुचाकीचा वापर करतात. दिनांक 30 जुलै रोजी रात्री त्यांनी घराच्या अंगणात त्यांची दुचाकी लावली.

दुस-या दिवशी सकाळी त्यांना जाग आली असता त्यांना दुचाकी आढळली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, परंतु मोटरसायकल सापडली नाही. त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Comments are closed.