नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महालक्ष्मी सुपर अबॅकसचे सुयश

वणीचे विद्यार्थी चमकले छ. संभाजीनगर मध्ये

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एमजीएम युनिव्हर्सिटी, छ. संभाजीनगर येथे 27 जुलै 2025 रोजी आयोजित नॅशनल समर चॅम्पियनशिपमध्ये महालक्ष्मी सुपर अबॅकस संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एकता नालमवार व दिव्या गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेत लेवल 1 मध्ये आभा कोंडावार, अवनी गोरंटीवार, युगांश पोपली, हितार्थ कटारिया, जिगीषा कोठारी यांनी उत्कृष्ट सहभाग दर्शवला, तर श्रीयंश कोंडावार यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. अंश बिज्जमवार यांनी चौथ्या रँकसह विजेतेपद मिळवले. तर मार्गदर्शक एकता नालमवार व दिव्या गोरंटीवार यांना आयोजकांनी ‘शायनिंग स्टार’ म्हणून सन्मानित केले.

कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शालिनी अंकुशे, मनीष महाजन, विनोद जैन, रेखा मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्य, गती, अचूकता व आत्मविश्वास वाढत असल्याचे नमूद केले.

Comments are closed.