पुरुषोत्तम नवघरे, वणी: एका शेतक-याने घरासमोर ट्रॅ्क्टर व मालवाहू लावला होता. मात्र सकाळी उठल्यावर दोन्ही वाहनं सुरु होत नव्हती. दरम्यान वाहन मालकाला दोन्ही वाहनाची बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून सदर बॅटरी कॉलेजच्या 5 अल्पवयीन मुलांनी चोरली, तसेच त्यांनी या आधाही सहा ठिकाणी बॅटरी चोरल्याची कबुली दिली.
तक्रारदार राजू विलास पिंपळशेंडे (वय 33, रा. नायगाव खुर्द, ता. वणी) यांच्या मालकीचे ट्रॅक्टर व टाटा 407 हे मालवाहू आहे. दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांनी आपला ट्रॅक्टर आणि टाटा 407 वाहन घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाहन चालू करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र दोन्ही वाहनं चालू होत नव्हते. त्यामुळे त्यांनी बॅटरीची तपासणी केली असा त्यांना दोन्ही वाहनातील बॅटरी गायब असल्याचे आढळले.
त्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु बॅटऱ्या सापडल्या नाहीत. यानंतर त्यांनी चोरीचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. चालकाने त्याच्या मित्रासह बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी सहा ठिकाणी बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाचही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन आठ बॅटऱ्या जप्त केल्या.
हे सर्व बारावीचे विद्यार्थी आहेत. अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर, डीबी पथकातील पो.उप.नि. धीरज गूल्हाने, पो.कॉ. मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार आणि गजानन कुडमेथे यांनी केली.



Comments are closed.