बोरगाव (मे) येथे महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार

शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांबाबत मार्गदर्शन

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोरगाव (मे) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन महसूल विभाग, वणी यांच्याद्वारे करण्यात आले. या शिबिरात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतक-यांवा 7/12, नमुना 8 अ तसेच फवारणी पम्प आणि शालेय विद्यार्थ्यांना दाखले वितरित करण्यात आले.

शिबिरात तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी मनिषा थेरे, उपकृषी अधिकारी ए. डी. कन्नाके, सहाय्यक कृषी अधिकारी एम. आर. पत्रे, एस. एम. घुगे आणि डी. आर. बर्डे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी एम. आर. पत्रे यांनी फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना, तुती लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, यांत्रिकीकरण आणि PMFME योजनांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी आणि खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्याचे आवाहन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी एस. एम. घुगे यांनी तुती लागवड, बांबू लागवड आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांबाबत माहिती दिली, तर डी. आर. बर्डे यांनी पारंपरिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीपूरक व्यवसायांचे महत्त्व पटवून दिले. सरपंच प्रियंका कोल्हे यांनी शेतकऱ्यांना फवारणी कीट वाटप केले आणि विषबाधा झाल्यास प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिरात माहिती पत्रकांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच पद्माकर देरकर, पोलिस पाटील प्रदीप बलकी, सुधाकर तुरानकर, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कतरे यांनी केले, तर एम. आर. पत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed.